Wed. Jun 19th, 2019

शबाना आज़मी यांचे बदलले बोल, तरीही झाल्या troll!

0Shares

भाजपप्रणित NDA ला बहुमत मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालंय. याबद्दल अनेकांनी नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलंय. मोदी यांच्याशी वैचारिक मतभेद असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आज़मी यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलंय. मात्र तरीही त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलंय.

 

‘भारतीय जनतेनं इतक्या प्रचंड बहुमतानं निवडून दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन’ असं शबाना आज़मी यांनी Tweet केलं.

मात्र त्यानंतरही शबाना आझमी यांना पाकिस्तानला पाठवण्याची भाषा सुरू आहे.

तसंच त्यांच्या या अभिनंदनाला अभिनय मानून याबद्दल ऑस्कर द्यायला हवं, अशीही प्रतिक्रिया लोक देत आहेत.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: