Wed. Jun 23rd, 2021

प्रेक्षकांची लाडकी ‘शितली’ परत येतेय!

झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ मालिका नुकतीच संपली. या मालिकेतील सैनिक होऊन देशसेवेचं स्वप्न पाहाणारा ‘अजा’ जेवढा प्रेक्षकांना भावला, तेवढीच त्याची नायिका ‘शितली’ देखील प्रेक्षकांना आवडली. ही मालिका संपल्यावर आता प्रेक्षकांची लाडकी शितली पुन्हा कधी भेटणार असा प्रश्न विचारला जात होता. मात्र शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. झी मराठीवरच्याच ‘आल्टी पाल्टी’ या नव्या मालिकेत पुन्हा प्रेक्षकांना शितली भेटणार आहे.

View this post on Instagram

When the mornings are good ☺

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar) on


 

अभिनेत्री शिवानी बावकरसोबत या मालिकेत कोण असणार आहे, याबद्दल असून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र शितली या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हे मात्र निश्चित.

View this post on Instagram

OH MY GOD! I could not believe the love and the excitement I experienced on my birthday this time. It was the loveliest birthday ever. I'm so lucky to be a part of #LagiraJhalaJi. The cutest friends, the bestest crew, the loveliest fans and my dearest family made my day! From the surprise cake cutting party on the terrace, the family time I spent with my parents and my sister, fans coming all the way from Nashik, Aurangabad, Gujarat just to wish, to the cake cutting sessions on the set, the overflowing wishes on Facebook, Instagram, WhatsApp, everything was just magical. I can't be more than grateful to the people God has sent to me in life. Really lucky to have you guys. Just in case you missed the insights, the photos and videos from yesterday are uploaded as story highlights on my page. Thanks for making my 25th sooooo special ❤️🥰 Photo credits: Sissy Missy

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar) on

या मालिकेत तिची भूमिका कशी असणार आहे, तिचं पात्र शितलीसारखंच असणार आहे की वेगळं, हेदेखील अजून सांगण्यात आलेलं नाही. शिवानी ही जरी ‘लागिरं झालं जी’ मालिकेत गावातील बिनधास्त तरुणीच्या भूमिकेत असली, तरी पुढच्या मालिकेत ती पुन्हा तशाच भूमिकेत असेल, की शहरी पात्र ती साकारणार आहे, हे लवकरच दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *