Sun. Aug 25th, 2019

सनी लिओनी सुरू करतेय लहान मुलांसाठी शाळा!

0Shares

अभिनेत्री सनी लिओनी ही बॉलिवूडमध्ये आल्यापासून आपल्या पॉर्न background मुळे सातत्याने टिकेचा सामना करतेय. तिच्यामुळे मुलं बिघडतील, तरुण वाईट मार्गाला लागतील, लहान मुलांपुढे कोणते आदर्श निर्माण होतील अशा एक ना अनेक टीका तिला सहन कराव्या लागल्या. पॉर्न अभिनेत्री असल्यामुळे मुंबईमध्ये तिला कुणी घरही द्यायला तयार नव्हतं. मात्र आज सनी लिओनी या सर्व परिस्थितीला तोंड देऊन मुंबईत स्थिरावलीय. एवढंच नव्हे, तिने मुलीला दत्तकही घेतलं आणि आता तर ती चक्क शाळा सुरू करतेय.

आपली मुलगी निशा हिच्यापासून सनी लिओनीला शाळा सुरू करण्याची कल्पना सुचली. केवळ शिक्षणच नव्ह, तर लहानग्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे उपक्रमही तिला आपल्या शाळेत राबवायची इच्छा आहे.

यासाठीच ती लहान मुलांसाठी शिशूवर्ग स्थापन करत आहे.

एकेकाळी मुंबईत भाडेकरू म्हणून देखील जिला कुणी ठेवून घ्यायला तयार होत नव्हतं, त्या सनी लिओनीने मुंबईतील जुहू येथे शिशूवर्ग चालवण्यासाठी जागा फायनल केली आहे.

केवळ ही एकच नव्हे तर देशभरात 25 शाळा सुरू करण्याचा सनी लिओनीचा मानस आहे.

मुलं सनी लिओनीमुळे बिघडतील अशी टीका करणाऱ्यांना या गोष्टीने नक्कीच आश्चर्य वाटेल, की सनी लिओनी चक्क मुलांमधून भविष्यात चांगले नागरिक घडावेत यासाठी शाळांचं जाळं काढतेय.

या शाळेबद्दल सनी अजून जास्त काही सांगत नसली, तरी ती या उपक्रमाबद्दल अतिशय गंभी आणि संवेदनशील असल्याचं तिच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे. या शाळेचं नाव काय असेल, आणि यात लहान मुलांना कसं शिकायला मिळेल हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तसंच स्वतः सनी या शाळेत शिक्षिका म्हणून सहभाग होणार का, किंवा शाळेला भेट देत राहणार का असाही सवाल आहे.

एक मात्र खरं की सनी लिओनी आपल्या सामाजिक सेवेने लोकांमध्ये आपली प्रतिमा पूर्णपणे बदलून टाकत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *