Wed. Dec 1st, 2021

70 च्या दशकातील अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन

70 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं मुंबईतील क्रिटीकेयर इस्पितळात निधन झालं. त्या 71 वर्षांच्या होत्या फुप्फुस आणि हृदयविकाराच्या आजारामुळे त्रस्त झाल्यामुळे विद्या सिन्हा यांना तीन दिवसांपासून व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलं होतं.

‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’, ‘सबूत’ आणि ‘पती पत्नी और वह’ या चित्रपटामधून 1970 आणि 1980 चा काळ त्यांनी गाजवला.

जेव्हा 70च्या दशकात अमिताभ बच्चन यांचे ‘अँग्री यंग मॅन’ इमेजवाले सिनेमे बॉक्स ऑफिसवर गल्ला गोळा करत होते, त्याच काळात दुसरीकडे अमोल पालेकर यांचे वास्तववादी पण मनोरंजक सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होते.

विद्या सिन्हा यांनी अमोल पालेकर यांच्यासोबत ‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’ सिनेमांमध्ये काम केलं. ग्लॅमरस अभिनेत्रींच्या गर्दीत विद्या सिन्हा यांचं सोज्वळ रूप प्रेक्षकांना भावलं.

सिनेमांबरोबरच नंतरच्या काळात अनेक टीव्ही मालिकांमधूनसुध्दा त्यांनी भूमिका केल्या. ‘काव्यांजली’, ‘भाभी’ आणि ‘बहुरानी’ या मालिकांमध्ये त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या.

2011 मध्ये सलमान खान यांच्या बॉडीगार्ड चित्रपटातही त्या झळकल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *