Wed. Dec 8th, 2021

शिवसैनिकांकडून अदानीच्या नामफलकाची तोडफोड

मुंबई : मुंबई विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या अदानींच्या नामफलकाला शिवसेनेने विरोध करत तोडफोड केली आहे. शिवसैनिकांनी विमानतळाबाहेर लावलेल्या नामफलकाची तोडफोड करत तिथून हटवला आहे. जीव्हीके कंपनीकडून ताबा मिळाल्यानंतर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असे नामफलक तिथे लावले होते. त्याला शिवसैनिकांनी कडाडून विरोध केला आणि नामफलकाची तोडफोड करण्यात आली. या ठिकाणी सध्या मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या सर्व घटनेनंतर अदानी समूहाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

“आधीच्या कंपनीच्या ठिकाणी आम्ही ब्रॅन्डिंग करत आहोत आणि हे ब्रॅन्डिंग सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही किंवा या नावाच्या ब्रॅन्डिंगमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या निकषानुसारच या सर्व गोष्टी केल्या जातात. या ठिकाणी व्यवस्थापनाचे अधिकार असलेली आधीची कंपनी ही जीव्हीके कंपनी होती. जिथे जीव्हीकेचे ब्रॅन्डिंग होतं तिथे अदानी एअरपोर्ट ब्रॅन्डिंग करत आहे,” असे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *