Jaimaharashtra news

‘भारतीयांवर अन्याय करून लस परदेशात निर्यात केली नाही’

सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी लस निर्यातीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा अनाठायी असल्याचे स्पष्ट केलं आहे. भारतीयांवर अन्याय करून लास परदेशात निर्यात केली नाही, असं स्पष्टीकरण अदर पुनावाला यांनी दिलं आहे.

जानेवारी २०२१ मध्ये सीरमकडे लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होता. त्या बळावर देशातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्याच दरम्यान देशात आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे देशातील साथ आटोक्यात आल्याचा समज आरोग्य तज्ज्ञांसह सर्वानी करून घेतला होता.

मात्र, जगातील काही देशांमध्ये त्यावेळी कोरोना साथीचे संकट अत्यंत गंभीर होते. संकटकाळात परस्परांना मदत करण्याचे देशाचे धोरण आहे. त्याचा उपयोग वेळोवेळी इतर देशांना तसेच भारतालाही झाला आहे, असे पूनावाला यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version