Thu. May 13th, 2021

लवकरचं कोविशिल्ड ही लस भारतात उपलब्ध होणार

सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला दावा…

सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला दावा केलेला केला आहे की, कोरोनावरील लस बाजारात येण्यासाठी आता केवळ तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं म्हटलं आहे. एप्रिल ते मे महिन्यादरम्यान कोविशिल्ड ही लस भारतात उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

कोरोना या लसीमुळे आपण किती कालावधीसाठी सुरक्षित राहू यासंदर्भात त्यांनी माहिती यावेळी सांगितली नाही. शिवाय या लसीची किंमत किती असेल याबाबतही त्यांनी स्पष्ट केलं नाही. कोरोनावरील लस ही इतक्या लवकर बाजारात येईल यांचा विचार कुणी केला नव्हता. ‘हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समिट २०२०’ या कार्यक्रमात बोलताना पूनावाला यांनी ही माहिती दिली. ‘या लसींमुळे आपण किती कालावधीसाठी सुरक्षित राहू याचं उत्तर वेळच देईल. सध्या याबाबत कोणतंही आश्वासन देता येणार नाही’ असं त्यांनी म्हटलं आहे. मॉडर्ना आणि फायझरच्या लसी महागड्या आहेत आणि त्यांच्या साठवणुकीचा मुख्य प्रश्न आहे, परंतु या लसीपासून आपण किती कालावधीसाठी सुरक्षित राहू हा मोठा प्रश्न आहे.

या लसीची सर्वाधिक किंमत ही १ हजार रूपये असेल,” असंही पूनावाला यांनी सांगितलं. “सरकार मोठ्या प्रमाणात लसीची खरेदी करेल त्यामुळे ही लस कमी किंमतीत उपलब्ध होईल. आम्ही लवकरच दर महिन्याला १० कोटी डोसचं उत्पादन करणार आहोत,” असंही त्यांनी सांगितलं. आम्ही उत्पादन क्षमता वाढवत आहोत आणि जुलैपर्यंत भारतात ३० ते ४० कोटी डोस देऊ शकणार असल्याचंही पूनावाला म्हणाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्ध यांनी पुढील तीन ते चार महिन्यात करोनावरील लस तयार होणार असल्याचा दावा केला होता. तसंच कोणाला सर्वप्रथम ही लस दिली जाईल याची योजना सरकारनं तयार केल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *