Sat. Nov 27th, 2021

‘शिवभोजन’ थाळी ‘आधार’ कार्ड सक्तीचं

अवघ्या 10 रुपयांत जेवण पुरवणाऱ्या ‘शिवभोजन’ थाळी योजनेची सुरुवात 26 जानेवारीपासून सुरू होत आहे. मात्र हे शिवभोजन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आणखी एका नियमांची पूर्तता करणं गरजेचं आहे. हा नियम म्हणजे ‘शिवथाळी’ साठी ग्राहकाने आपलं आधार कार्ड दाखवणं सक्तीचं आहे. गरिबांना 10 रूपयात जरी थाळी मिळणार असली, तरी त्यासाठी अनेक अटीशर्थीही आहेत. आधारकार्ड ही त्यातलीच एक. आधारकार्डावरील फोटो जुळला तरच ‘शिवभोजन’ मिळणार आहे.

सरकारच्या या नव्या नियमावर भाजप आमदार राम कदम यांनी सडकून टीका केली आहे.
गरीबांना जेवण देताय की त्यांची थट्टा करताय, असा सवाल त्यांनी विचारलाय.
सर्वांना बिनशर्त जेवायला मिळालं पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
भुकेलेल्यांना अन्न देताना सरकारने त्यांवर अटी घालून चेष्टा केली आहे.
कर्जमाफी जितकी फसवी आहे, तितकीच भोजनथाळीही फसवी आहे; असं ट्वीट ही राम कदम यांनी केलं आहे.

तर लोकांना जेवण देताय की भीक देताय ? असा सवाल मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केला आहे.

काय आहे शिवभोजन थाळी?

दुपारी 12 ते 2 यावेळेत शिवभोजन थाळीचा लाभ घेता येणार आहे.

थाळीत 2 पोळ्या 1 वाटी भात डाळ आणि भाजी असणार आहे.

मुंबई शहराला दिवसाला 1950 थाळ्या दिल्या जाणार आहेत.

तर ठाण्याला 1350, उस्मानाबादला 250, औरंगाबाद जिल्ह्यात 500 पुण्यात 1000 थाळ्या तर पिंपरी चिंचवड मध्ये 500 शिवभोजन थाळ्या दिल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *