Jaimaharashtra news

आदित्य पंचोलीच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य आहे, जी लाइमलाइटपासून दूर राहते.

बॉलिवूड अभिनेता आदित्य पंचोली आणि त्याचे कुटुंब हे अनेकदा चर्चेत आले आहे. आदित्य पंचोलीच कंगना रनौतसोबतच्या अफेयर्सच्या अनेकवेळा बॉलिवूडमध्ये चर्चा होतातच मात्र याव्यतिरिक्त आदित्य पंचोलीचा मुलगा सुरज पंचोली हा जिया खानच्या मृत्यूमुळे चर्चेत आला होता. जिया खानच्या खून प्रकरणात सूरज पंचोलीचे नाव समोर आले होतं. आदित्यच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य आहे, जी लाइमलाइटपासून दूर राहतो. ती म्हणजे आदित्या पांचोलीची मुलगी सना पंचोली. तिला देखील बॉलिवूडमध्ये आपले करियर बनवायचे होते, मात्र सनाच्या नशिबात काहीतरी वेगळे लिहिलं होतं. सनाने लॉस एंजोलिस येथे शिक्षण घेतले होते. आपल्या कुटुंबियांप्रमाणे तिलाही सिनेसृष्टीत आपली कारकिर्द पार पाडायची होती. २००६ मध्ये सुनील दर्शन सना आणि उपेन पटेल यांच्यासोबत एक चित्रपट बनविणार होते. मात्र काही कारणांमुळे शक्य झाले नाही. या चित्रपटात सनाची जागा ही कंगना रनौत घेतली होती. चित्रपटाचे नाव होते- शाकालका बुम बूम. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. यावेळी कंगना आणि आदित्य पंचोलीच्या अफेयर्सच्या बातम्या समोर आल्या होत्या. या चित्रपटातून बाहेर गेल्यानंतर मात्र सनाने अभिनेत्री बनण्याचा विचार डोक्यातून काढून टाकला होता. सनाची बॉन्डिंग ही तिच्या भावाबरोबर म्हणजेच सुरज पांचोलीबरोबर चांगली आहे. दोघही स्टार किड एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. एका मुलाखतीत सनाने आपला भाऊ सूरजसोबतच्या बॉन्डिंगविषयी बोलले होते. सना म्हणाली की सूरज स्वभावाला फार कूल आहे, तर मी त्याच्या विरुद्ध आहे. तो अगदी आपल्या वडिलांसारखा आहे, त्याला लवकर राग येतो. असंही ती म्हणाली होती. सना आणि सूरज यांची टाइगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. कित्येकदा ही चौघे एकत्र पाहायला मिळाली आहेत.

Exit mobile version