Tue. Aug 3rd, 2021

आरे काॅलनीतील झाडं तोडणाऱ्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवं – आदित्य ठाकरे

आरे काॅलनीतील झाडं तोडणाऱ्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवं ,अशी टिका आदित्य यांनी ट्विटवरुन केली आहे.

आरे प्रकरण हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. ‘आरेमधील जैवविविधता संपवण्याचा हा जो घाट रचला आहे तो लज्जास्पद आहे. ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरे काॅलनीतील झाडं तोडत आहेत. ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवं. येथील झाडं तोडण्यापेक्षा या अधिकाऱ्यांनी पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ नष्ट केले तर अधिक बरं होईल ना?,’ अशी टिका आदित्य यांनी ट्विटवरुन केली आहे.
‘आरे कारशेड परिसरातील अनेक पर्यावरणवादी तसेच स्थानिक शिवसैनिकांनी वृक्षतोड करण्याचा हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला.  मात्र तेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ज्यापद्धतीने आपण मुंबई मेट्रो तीनसाठी जंगल नष्ट करत आहोत ते पाहता हा प्रकल्प भारताने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत मांडलेले सर्व दावे खोडून टाकताना दिसत आहे,’ असं आदित्य यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *