Sat. Feb 29th, 2020

खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान गाडीचा टायर फुटला

जय महाराष्ट्र वेब न्यूज, नाशिक

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना खड्ड्यांचा फटका बसला आहे. नाशिकला 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात असताना घोटीजवळ मोठ्या खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटला आहे. आदित्य ठाकरे सुखरुप असून टायर फुटल्याने त्यांना दुसऱ्या गाडीने नाशिकला जावं लागलं.

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घोटीजवळ पाडळी गावातील रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने ही घटना घडली.

आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटल्याने त्यांच्यासोबत असलेल्या इतर मंडळींची दगदग झाली. या घटनेनंतर आदित्य ठाकरे दुसऱ्या गाडीने नाशिकला पोहचले.

तसेच त्यांची टायर फुटलेली गाडी टायर बदलण्यासाठी नाशिकला आणली गेली. या घटनेनंतर रस्त्यावरील खड्ड्यांबाबत यापूर्वीही प्रशासनाकडे तक्रार केली असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *