Tue. Jun 28th, 2022

आदित्य ठाकरे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल, जोरदार शक्तिप्रदर्शन

ठाकरे कुटुंबीयांच्या पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत निवडणूक लढविणारे आदित्य ठाकरे हे पहिलेच ठाकरे आहेत.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी वरळीतून पदयात्रेला सुरुवात केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करुन आदित्य यांनी पदयात्रेला सुरुवात केली आहे. या पदयात्रेच्या वेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित असून शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात शक्तीपदर्शन करण्यात येत आहे.

शिवसैनिकाकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन

“नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी हीच ती वेळ” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यात घोषणा केली होती.

ठाकरे कुटुंबीयांच्या पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत निवडणूक लढविणारे हे आदित्य ठाकरे पहिलेच ठाकरे आहेत.

वरळी मध्ये झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी आपण या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहिर केले होतं.

वरळीमधील आमदार सुनील शिंदे यांच्याशी चर्चा करुनच आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहिर करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सुरेश माने हे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

नुकताच नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांची साथ देखील आदित्य ठाकरे यांना मिळण्याची शक्यता असते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.