Mon. Jan 17th, 2022

आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची दिल्लीत प्रथमच भेट

आणिबाणीच्या (Emergency) काळात पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची भेट गाजली होती. त्या दोन्ही नेत्यांच्या नातवांची राजधानीत भेट झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. (Aditya Thackeray meets Rahul Gandhi)

यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी गांधी परिवाराला आमंत्रित करण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीला गेले होते.

मात्र त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली होती. तेव्हा राहुल गांधींशी त्यांची भेट झाली नव्हती.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीला सदिच्छा भेटीचं नाव त्यांनी दिलं असलं, तरी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यापूर्वी त्यांनी Facebook, Instagram मुख्यालयाला भेट दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *