Sun. Aug 25th, 2019

सरसकट कर्जमुक्ती घेतल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही- आदित्य ठाकरे

0Shares

शिवसेना हा सतत सामान्य माणसांसाठी संघर्ष करणारा पक्ष आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी सरसकट घेतल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही, असा विश्वास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.  काल संध्याकाळी जन आशीर्वाद यात्रेनिमित्त परभणी जिल्ह्यातल्या मानवत येथे उपस्थितांशी संवाद साधताण्यासाठी आले होते. तत्पुर्वी दिवसभर जिल्हातील पालम , गंगाखेड ,पाथरी व लोकांशी त्यांनी संवाद साधला.

पीक विमा संदर्भात बोलताना ते म्हणाले की इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी मुंबईकरांनी मोर्चा काढला होता. पंधरा दिवसाच्या आतच या मोर्चाचे परिणाम दिसत असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा वर्ग होत असल्याचेही ते म्हणाले. पळ काढणाऱ्या विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा मिळवून देणारच, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री रामदास कदम, सचिन अहीर, चंद्रकांत खैरे, आदी उपस्थित होते. यावेळी मानवत तालुक्यातील 24 आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला प्रत्येकी चार खतांची पोते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *