Wed. Jun 26th, 2019

विधानसभेत आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?

0Shares

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीला चांगलं यश मिळालं. त्यामुळे काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवणुकीत सुद्धा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लोकसभेमध्ये एनडीएने 354 जागा जिंकल्या आहेत. तसेच राज्यातही युतीला 41 जागा मिळाल्यानंतर विधानसभाही एकत्र लढवणार आहेत. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी मागणी वरूण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मागणी केली.

नेमकी मागणी काय ?

लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात युतीला चांगलं यश मिळाल्यानंतर पुन्हा एकदा युतीनेच विधानसभा निवडणुका लढवणार आहेत.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काही महिन्यांनीच विधानसभा निवडणुका पार पडत असल्यामुळे युती सज्ज झाली आहे.

यंदा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ही मागणी आदित्य ठाकरे यांचे बंधू वरूण सरदेसाई यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत केली आहे.

मात्र आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का ? हे महत्तावचे ठरणार आहे.

तसेच जर आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली तर पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: