आदित्य ठाकरे ‘मंत्रिपद’ सोडणार?

कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटर बायोमधील स्वत:च्या मंत्रीपदाचा उल्लेख काढून टाकला आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच हे वृत्त आलं आहे.
शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासह असेलेले आमदार अधिक आक्रमक झाले आहेत. अशातच, आदित्य ठाकरेंनी ट्विट्र प्रोफाईलवरून मंत्रीपदाचा उल्लेख काढला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर काल ट्विट करत मी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्त्वाचा विचार सोडला नसल्याचे ते म्हटले आहे. आणि आता, आदित्य ठाकरे यांनी मंत्रीपदाचा उल्लेक हटवला आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटरवरील शिवसेनेचा उल्लेख हटवलेला नाहीए. त्यामुळे आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आले असून, आदित्य ठाकरे मंत्रीपदाचा राजीनामा देतात क? असा सवाल उपस्थित होत आहे.