Wed. Jun 29th, 2022

आदित्य ठाकरेंचा १५ जूनला अयोध्या दौरा 

शिवसेना नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला आहे. परंतु, आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांसह अयोध्येत पोहचणार आहेत. १५ जूनला आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा आहे. त्याच दिवशी ते शरयूतीरी आरती करणार आहेत, अशी माहिती सेना प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी दिली. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते, पदाधिकारी देखील असणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी काही शिवसेना नेते अयोध्येत जाऊन तयारीचा आढावा घेणार आहेत. खासदार संजय राऊत स्वत: अयोध्येला जाऊन हा आढावा घेणार आहेत. आदित्य यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, वरुण सरदेसाई असे १५ जण अयोध्येला जाणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. “ जय श्रीराम. १५ जून चलो अयोध्या… आदित्य ठाकरे शेकडो शिवसैनिकांसह अयोध्येला येणार. रामलल्लाचे दर्शन घेणार.” असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे. दौऱ्यादरम्यान आता काय होणार हे देखील पाहणे महत्वाचे ठारणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.