Tue. Sep 29th, 2020

‘नवे रस्ते घडवले तरी नवा महाराष्ट्र घडेल’, सुमीत राघवनचा आदित्य ठाकरेंना टोला

नुकतीच केंद्रिय निवडणूक आयोगाने आज हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूकीची तारीख जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात घोषणा केली असून 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होईल. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणुकीची घोषणा होताच अनेकांच्या यावरती प्रतिक्रीया यायला सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरेंनीही यावर आपली भूमिका मांडली आहे.  ‘निवडणुकीची घोषणा झालीय, लोकशाहीचा उत्सव सुरू झालाय. ‘तुमचं सरकार, तुमचं भवितव्य घडवण्याचा अधिकार बजावण्याची वेळ आली आहे. हीच ती नवा महाराष्ट्र घडवण्याची वेळ आहे,’ असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.

आदित्य यांच्या या ‘नव्या महाराष्ट्रा’चे ट्विट सुमीत राघवनला आवडलेले दिसत नाही. त्याने अत्यंत यावर बोचरी टीका करत ट्विट केले आहे.

‘नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल,’ असं त्याने ट्वीटमध्ये लिहिले आहे सोबत #येरेमाझ्यामागल्या असा हॅशटॅगही दिलाय. या टिकेला आता आदित्य ठाकरे काय उत्तर देतात याकडे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *