शिवसेनेला मराठीचा विसर? वरळीत आदित्य ठाकरे यांची गुजरातीत बॅनरबाजी!

मराठीच्या मुद्द्यावर लढणाऱ्या शिवसेनेलाच मराठीचा विसर पडला का असा प्रश्न निर्माण झालाय. निवडणूक लढवणारा पहिला ठाकरे म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यावर वरळीमधून निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं. मात्र या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी चक्क गुजरातीत बॅनरबाजी केलीय.

वरळीतल्या मराठी माणसाला विसरून आदित्य ठाकरे चक्क गुजरातीमध्ये ‘केम छो वरली?’ असं विचारत असल्याचं पोस्टर तेही गुजरातीमध्ये पाहायला मिळतंय. वरळीच्या पोद्दार हॉस्पिटलजवळ उंचावरचं हे बॅनर चर्चेचा विषय ठरलंय.

त्यामुळे निवडणुकीला उभं राहताच शिवसेनेला मराठीचा विसर पडला का? असा प्रश्न निर्माण झालाय.

Exit mobile version