Mon. Jul 22nd, 2019

आदित्य निवडणूक लढवणार नाही – उद्धव ठाकरे

284Shares

आगामी लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर कोणतही बंधन घातले नव्हते त्याचप्रमाणे मी सुद्धा आदित्यवर कोणतही बंधन घातलेले नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य भविष्यात निवडणूक लढवायची की नाही ते तो स्वत: आणि शिवसेैनिक ठरवतील असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे निवडणुक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.

आदित्य ठाकरे लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक लढवणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला.

तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आदित्य सध्या निवडणुका लढवणार नाही असं  स्पष्ट सांगितलं.

त्याचबरोबर  शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर कोणतही बंधन घातले नव्हते त्याचप्रमाणे मी सुद्धा आदित्यवर कोणतही बंधन घातलेले नाही.

याबाबतीत आदित्यच उत्तर देईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांची यादी एक ते दोन दिवसात जाहीर करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

 

 

 

 

284Shares

Leave a Reply

%d bloggers like this: