आदित्यनाथ आणि मायावतींच्या प्रचारावर आयोगाची बंदी

लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली असून भाजपाने उत्तर प्रदेशच्या 7 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गोरखपूरमधून भोजपूरी अभिनेता रवि किशन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी खासदार शरद त्रिपाठी यांना तिकीट न देता प्रवीण निषद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 72 तास प्रचार करण्यावर बंदी घातली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

भाजपाने उत्तर प्रदेशच्या 7 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

यावेळी खासदार शरद त्रिपाठी यांना उमेदवारी न देता प्रवीण निषद यांना संत कबीर नगर येथून उमेदवारी दिली आहे.

तसेच गोरखपूरमधून भोजपूरी अभिनेता रवि किशन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मायावती यांना प्रचारादरम्यान आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकणी प्रचारासाठी बंदी घातली आहे.

योगी आदित्यानाथ यांना 72 तास तर मायावती यांना 48 तास प्रचार करण्यापासून बंदी घातली आहे.

त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना 3 दिवस तर मायावती यांना 2 दिवस प्रचार करता येणार नसल्याचे सांगितले आहे.

 

 

 

 

Exit mobile version