Wed. Jun 29th, 2022

कबूल है…! नवाब मलिकांचे नवे ट्विट

  क्रुझवरील ड्रग्जपार्टीप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले. तसेच समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. त्याबाबतचे अनेक पुरावे मलिकांनी ट्विट करत समोर आणले आहेत. अशातच नवाब मलिकांनी आणखी एक फोटो शेअर करत समीर वानखेडे यांच्यावर आरोप केला आहे.

  नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटरवरून समीर वानखेडे यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वानखेडे मुस्लीम वेशात दिसत आहेत. हा फोटो ट्वीट करत मलिकांनी लिहिले की, कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे? असे लिहिले.

  नवाब मलिकांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये समीर वानखेडे लग्नातील खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. तर त्यांच्या शेजारीच बसलेले एक व्यक्ती त्यांची काही कागदपत्रांवर सही घेताना दिसत आहेत. हे दोघेही मुस्लीम पोशाखात दिसत आहेत. त्यामुळे मलिकांनी शेअर केलेल्या या फोटोमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

  नवाब मलिकांनी समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. तसेच त्या सबंधीचे अनेक पुरावे मलिकांनी सादर केले आहेत. मलिकांनी समीर वानखेडे यांचे जातप्रमाणपत्रासह त्यांच्या शाळेचा दाखलाही सादर केला. तसेच आता मलिकांनी समीर वानखेडे यांचा नवा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.