Fri. May 20th, 2022

बॉलिवूड गायक अदनान सामीने इम्रान खानला सुनावलं

पाकिस्तानी पंतप्रधानला दिलं अदनान सामीने उत्तर

देशभरात ठिकठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (#CAA) वेगवेगळ्या प्रतिक्रया उमटत आहेत. देशातच नाही तर भारताबाहेरही याचे पडसाद पडताना दिसत आहे.
पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनीही सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध करत एक Tweet केलं आहे.

इम्रान खान यांनी टविट्मध्ये भारताच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय मानवी हक्काचे आणि काद्याच्या नियमाचे उल्लंघन होत आहे असे म्हटलं आहे.
इम्रान खानने मोदी सरकार आणि भाजपाची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे.
नागरिकत्व विधेयक हे ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेचा भाग आहे असे इम्रान खानने मोदी सरकारवर टीका केली आहे.

या ट्विटला बॉलवूड गायक अदनान सामीने उत्तर दिलं असून भारतात मुस्लीम लोक आनंदी आहे. अशी प्रतिक्रिया अदनान यांनी दिली.

या ट्विटमध्ये अदनान यांनी म्हटलं ‘प्रिय पाकिस्तान नागरिकांनो, जे स्वत:हून सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी चर्चेत सहभागी झाले आहेत… जर तुम्ही मुस्लिम नागरिकांची बाजू मांडत असेल तर सर्वात आधी हे मान्य करा की त्यांना तुमचा देश सोडायचा होता.
यासोबत ते तुमचे अस्तित्वच नाकारत आहेत. दुसरी गोष्टी म्हणजे जर तुम्हाला मुस्लिमान नागरिकांची इतकीच चिंता असेल तर मग तुमच्या सीमारेषा त्यांच्यासाठी सुरु करा
अन्यथा शांत राहा’ अशी प्रतिक्रिया अदनान यांनी दिली आहे.

त्यानंतर दुसऱ्या टविट्मध्ये त्यांनी अदनान यांनी म्हटलं की, भारतातील मुस्लीम समुदाय हा खूप आनंदी आहे. आणि ते भारतात आदराने वास्तव्य करतात.
हे ऐकून कदाचित तुम्हाला वाईट वाटेल’असा टोला हा अदनान यांनी इम्रान खानला केला आहे. त्यानंतर दुसऱ्या टविट्मध्ये त्यांनी अदनान यांनी म्हटलं की, भारतातील मुस्लीम समुदाय हा खूप आनंदी आहे. आणि ते भारतात आदराने वास्तव्य करतात.
हे ऐकून कदाचित तुम्हाला वाईट वाटेल’असा टोला हा अदनान यांनी इम्रान खानला लगावला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यातंर्गत भारताशेजारची पाकिस्तान अफगाणिस्तान, आणि बांग्लादेशातून धार्मिक छळामुळे अनेक नागरिक भारतात आले यात हिंदू, जैन, पारशी, शीख आणि ख्रिश्चन नागरिकांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.