ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्यांच्या सदावर्ते यांच्या कोठडीवर आज सुनावणी पार पडली असून वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची म्हणजेच ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तेसच या हल्ल्याप्रकरणी इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
न्यायमूर्ती के. जी. सावंत यांच्या खंडपीठासमोर गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीवर सुनावणी पार पडली. न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकीलांनी युक्तिवाद केला. सदावर्ते यांच्या बाजूने त्यांच्या पत्नी आणि वकील जयश्री पाटील, महेश वासवानी, घनश्याम उपाध्याय यांनी युक्तिवाद लढवला. तर वकील प्रदीप घरत यांनी सरकारी बाजू मांडली.
सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवाद
गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची कोठडी द्या.
सखोल चौकशीसाठी कोठडी हवी.
सदावर्तेंसह इतर आरोपींवरही गंभीर आरोप.
आरोपींवरील कलमं गंभीर.
पवारांच्या घरावरील हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध.
सदावर्तेंचे वकील महेश वासवानी यांचा युक्तिवाद
सदावर्तेंना तातडीने जामीन द्यावा.
आरोपी तपासाला प्रभावित करणार नाही.
सदावर्तेंच्या वक्तव्यांचा व्हिडिओ सादर करावा.
घरामध्ये घुसू असं सदावर्तें बोलले नाहीत.
सरकारविरुद्ध बोलल्याने सूडबुद्धीने कारवाई.