Sun. Apr 21st, 2019

म्हाडाच्या घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू

0Shares

मुंबईमध्ये घर घेण्याचं तुमचं स्वप्न आता पूर्ण व्हायच्या मार्गावर आहे. घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना 1,382 नागरिकांसाठी म्हाडाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आजपासून या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

दिवाळीच्या मुहूर्तावर ही जाहिरात प्रसिध्द झाल्याने सर्वसामान्यांचा हक्काच्या घराचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसंच आजपासून ते येत्या 10 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.

त्याशिवाय म्हाडाने यंदा घरांच्या किंमती 25 ते 30 टक्क्यांनी कमी केल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार चांदिवली,पवई येथील घरांच्या किंमती 14 लाखांपासून तर कंबाला हिल,ग्रॅंट रोड येथील घरांच्या किंमती ८० लाख रुपये ऐवढी असणार आहे.तर विभागानुसार घरांच्या किंमती ठरणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *