दाभोलकर हत्याप्रकरणातील अॅड. संजीव पुनाळेकरांना जामीन

दाभोलकर हत्येप्रकरणी अॅड. संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली आहे. संजीव पुनाळेकरांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 30,000 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना कोर्टाने जामीन दिला आहे.

संजीव पुनाळेकरांना जामीन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घुण हत्या करण्यात आली.

याप्रकरणी अॅड. संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली होती त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अ‍ॅड. पुनाळेकर आरोपींकडून बाजू मांडत होते. यामध्ये त्यांच्या लिपीकलाही अटक करण्यात आली होती.

या दोन्ही आरोपींना 4 जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. काल त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली आहे.

३०,००० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना कोर्टाने जामीन दिला आहे.

संजीव पुनाळेकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी सुरु आहे.

 

 

Exit mobile version