Sun. Sep 19th, 2021

आफ्रिदीची गरजूंना मदत, सचिन, विराट कधी पुढे येणार?

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या कोरोनामुळे जगातील अनेक देशांत राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. भारतातही लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अनेक सेलिब्रिटी यासंदर्भात जनजागृती करत आहेत. या सर्व लॉकडाऊन दरम्यान रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाकिस्तानातही लॉकडाऊन सुरू केला गेला आहे. तेथील हालाखीच्या परिस्थितीत क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने गरजूंना मोफत अन्नधान्य वाटप सुरू केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर भारतातही टेनिसपटू सानिया मिर्झा हिनेदेखील मजुरांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र भारतीय क्रिकेटपटू अशा प्रकारची कोणतीही मदत करताना दिसत नाहीयेत. याबद्दल नेटिझन्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांपैकी कोणत्याही क्रिकेटपटूने गरीब गरजूंना मदत केल्याचं अद्याप पुढे आलेलं नाही. त्यामुळे नेटिझन्स चिडले आहेत. हे क्रिकेटपटू कधी गरजूंना मदत करणार असा सवाल त्यांनी केला आहे.

सौरव गांगुलीने ५० लाखांची मदत केल्याबद्दल त्याचं कौतुक होत आहे. अनेकांना अन्नधान्य, स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक गोष्टींचे वितरण करण्याचं काम शाहिद आफ्रिदी करत आहे. पाकिस्तानातील पेशावर नजिकच्या खेडेगावांत शाहिद आफ्रिदी लोकांसाठी मदत करत आहे. मात्र अशी कोणतीही मदत भारतीय क्रिकेटपटू का करत नाही, असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत. भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या कर्तव्याची जाणीव कधी होणार, असा प्रश्न ते विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *