Thu. Aug 5th, 2021

#5YearChallengeच्या माध्यमातून भाजपानेचे घेतला मोदींच्या कामाचा आढावा

इंटरनेटवर सध्या #10YearChallenge ने धुमाकूळ घातली आहे. #10YearChallenge या हॅशटॅगच्या माध्यमातून आताचे आणि 10 वर्षापूर्वीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. सेलिब्रिटी ते सामान्य नागरीक या सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. #10YearChallenge या हॅशटॅग अंतर्गत  राजकीय नेत्यांनीही आपल्या विरोधकावर जोरदार टिका करयाला सुरवात केली आहे. तर भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून या हॅशटॅगचा वापर येत्या निवडणूकाच्या प्रचारासाठी केला आहे. #10YearChallenge यात थोडा बदल करून #5YearChallenge असा हॅशटॅग वापरत काँग्रेसच्या तुलनेत मोदींनी 5 वर्षात काय केले हे #5YearChallenge या हॅशटॅगच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या हॅशटॅगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून अनेक फोटो शेअर करण्यात आले असून यामध्ये सन 2013 साल आणि 2019 सालाची तुलना करण्यात आली आहे. अगदी कुंभ मेळ्यापासून ते स्वच्छ भारत योजनेतेपर्यंत आणि बांधकाम क्षेत्रापासून ते बँकिंग क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रात कशाप्रकारे भाजपाच्या कार्यकाळात देशाने प्रगती केली आहे यासंदर्भातील फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. आपल्या या #5YearChallenge मोहिमेमध्ये भाजपाने काय काय पोस्ट केले आहे ते पाहुयात…
कॉग्रेसच्या काळात 2013 मध्ये कुंभ मेळ्यासाठी फक्त 1,300 कोटी रुपये अनुदान दिले होते तर    भाजपने 2019 मध्ये कुंभ मेळ्यासाठी 4,200 कोटी रुपये दिले आहेत.,” असे भाजपने ट्विट केले आहे.

मंत्री पीयूष गोयल यांनी “बोगिबेल ब्रिज सारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे 5 वर्षात पूर्ण होणारे काम  #5YearChallenge  हॅशटॅग वापरत दाखविले केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 5 वर्षांत रेल्वेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणला आहे. तुम्हाला गेल्या 5 वर्षात मोदी काळात कोणते बदल झालेले दिसतात ते तुम्ही #5YearChallenge हॅशटॅगच्या माध्यमातून शेअर करा असे आवाहन धवल पटेल या नेटकऱ्याने नागरीकांनी केले आहे.

कांग्रेस नेता शशि थरूर यांनी  10 Year Challenge चैलेंज च्या माध्यमातून भाजपावर टिका केली आहे. त्यांनी 2009 आणि 2019 मधील राम मंदीर बाधंकामाच्या विटा चा फोटो तर भाजप कार्यालयाच्या 2009 आणि 2019 दरम्यान झालेल्या विकासाचा फोटो शेअर केला आहे.

अशाप्रकारे भाजपाच्या आयटी सेलने #10YearChallenge चा व्हायरल ट्रेण्ड इनकॅश करुन #5YearChallenge च्या माध्यमातून भाजपा सरकारच्या कार्यकाळातील कामांचा आढावा सर्वांसमोर मांडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *