Sun. Jan 16th, 2022

26 वर्षांनंतर ‘डीडीएलजे’ नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस

१९९५ साली दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा ब्लॉकबास्टर चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता तब्बल २६ वर्षांनंतर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपट नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यावेळी राज आणि सिमरनची लव्हस्टोरी म्युझिकल ब्रॉडवे संगीत नाट्यमय स्वरुपात सादर होणार आहे. आदित्य चोप्रा या चित्रपटाचे दिग्दर्शक करणार असून ब्रॉडवमध्ये नव्याने पदार्पण करणार आहेत.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाच्या ब्रॉडवेचे नाव ‘कम फॉल इन लव: द डीडीएलजे म्युझिकल’ असे आहे. या म्युझिकलचा प्रीमियर अमेरिकेतील सैन डिएगोमधील ओल्ड ग्लोब थिएटरमध्ये होणार आहे. निर्माते-दिग्दर्शक अदित्य चोप्रा यांनी संगीतमय कार्यक्रमाच्या प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध दिग्गजांच्या टीमची निवड केली आहे. या म्युझिकल ब्रॉडवेमध्ये संगीतकार विशाल शेखर या ब्रॉडवेसाठी संगीतकाराचे काम करणार आहेत. तर विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी कंपोझर म्हणून काम करणार आहेत.

आदित्य चोप्रा म्हणाले की, ‘मी सिनेसृष्टीचा माणसू असल्यामुळे मी कधीही थेएटर केले नाही. त्यामुळे मी माझ्या आयुष्यातील सर्वात विलक्षण महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. डीडीएलजे हा भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील शाहरुख आणि काजोलच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. या ब्रॉडवे कार्यक्रमाचे नाव ‘कम फॉल इन लव: द डीडीएलजे म्युझिकल’ असे असून हा शो यशराज फिल्म्स निर्मित करत आहे.’ असे ते म्हणाले.

‘कम फॉल इन लव: द डीडीएलजे म्युझिकल’चे ब्रॉडवेचा प्रिमीयर २०२२मध्ये सॅन डिएगोमधील ओल्ड ग्लोब थिएटरमध्ये सादर होणार आहे. तर येत्या २०२२-२०२३मध्ये या म्युझिकल ब्रॉडवेचे सादरीकरण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *