Mon. Jan 24th, 2022

अमरावतीत ६४ दिवसांनंतर लालपरी रस्त्यावर

राज्यात नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत. मात्र अद्याप कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. तर कामावर रुजू होण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात येत होते. तसेच कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर ६४ दिवसानंतर अमरावतीमधील लालपरी रस्त्यावर उतरली आहे.

६४ दिवसानंतर अमरावतीमधील चांदूर रेल्वे एटी.टी. आगरातून लालपरी धावायला सुरूवात झाली आहे. गुरुवारी पोलीसांच्या संरक्षणात दोन एसटी बस चांदूर रेल्वे-अमरावती मार्गावर रवाना झाल्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमरावतीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून बंद सलेली एसटी बससेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एसटी बससेवा बंद असल्यामुळे सामान्यांना प्रवास करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या, तसेच प्रवशांना पायपीट करत अंतर गाठावे लागत असे. काही वेळा खाजगी वाहन चालक प्रवाशाकंडून जास्तीचे पैसे आकारत होते. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत होती. मात्र, आता पुन्हा लालपरी रस्त्यावर धावू लागल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *