श्रीलंकेत पुन्हा एकदा स्फोट; कोलंबोजवळील पुगोडात स्फोट

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टर संडेच्या दिवशी 8 बॉम्बस्फोटातून श्रीलंकन नागरिक सावरत असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कोलंबोपासून 40 किमीच्या अंतरावर असणाऱ्या पुगोडा शहरात हा स्फोट झाला आहे. त्यामुळे नागिरकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच या स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबतची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
श्रीलंकामध्ये पुन्हा स्फोट ?
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये 8 बॉम्बस्फोट झाल्यामुळे श्रीलंका हादरली आहे.
ईस्टर संडेला कोलंबोमध्ये 3 चर्च आणि 3 फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाला होता.
या बॉम्बस्फोटात 300 जणांचा मृत्यू झाला असून 500हून अधिक गंभीर जखमी झाले होते.
गुरुवारी पुन्हा एकदा कोलंबोपासून 40 किमी अंतरावर असणाऱ्या पुगोडा शहरामध्ये स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हा स्फोट झाल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट असून याचा तपास सुरू आहे.