Sun. Jan 16th, 2022

आमिर खानची मुलगी आयरा खान झाली ट्रोल ; बॉयफ्रेन्डसोबत शॉपिंग केल्यानं ट्रोलर्सकडून वाईट शब्दात शेरेबाजी

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांचा 15 वर्षांचा संसार संपला आहे. आमिर आणि किरणने एकमताने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांना धक्का बसला. आमिरचं पहिलं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. मात्र त्यांचं नात फार काळ टीकू शकलं नाही. त्याचं पहिलं लग्न फक्त 15 वर्ष टिकलं. आमिर आणि पहिली पत्नी रीना यांना दोन मुलं आहेत. रीना आणि आमिरची मुलगी आयरा कायम चर्चेत असते. आयरा ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते.आयरा ही तिच्या पोस्टमुळे तर कधी नुपुर शिखरे, सोबत असलेल्या तिच्या रिलेशनमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा आयरा ही चर्चेत आली आहे. नुकतचं आयराला तिच्या बॉयफ्रेन्डसोबत स्पॉट करण्यात आलं होत.

आमिर आणि किरणच्या घटस्फोटानंतर आयरा ही तिच्या बॉयफ्रेन्डसोबत शॉपिंग करताना दिसली होती. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानं तिला अनेकजण ट्रोल करत आहे.प्रसिद्ध पॅपराजी विरल भयानीने आयरा आणि नुपुरचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत आयरा आणि नुपुर एकमेकांचा हात पकडून चालताना दिसत आहेत.आयराच्या हातात शॉपिंग बॅग आहेत. दोघांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक युझर म्हणला, ‘आयरा आता तिच्या वडिलांच्या तिसऱ्या लग्नाची तयारी करत आहे.’ तर काहीजणांनी तिच्यावर जोरदार टीका केल्या आहे. दरम्यान आमिर आणि किरण यांच्या घटस्फोटानंतर आयराने एक सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ‘पुढचा रिव्ह्यू उद्या… पुढे काय होणार आहे?’ असं तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं. तेव्हा देखील तिची ही पोस्ट सर्वांना गोंधळात टाकून देणारी होती. मात्र सध्याला आयराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *