Jaimaharashtra news

बलात्कारप्रकरणी नारायण साई दोषी, ३० एप्रिलला होणार शिक्षेची सुनावणी

बलात्काराच्या आरोपाची स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला होता. याप्रकरणी नारायण साईंवर बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. 11 वर्षांपूर्वी सुरतमध्ये राहणाऱ्या दोघा बहिणींनी आपल्यावर आश्रमातच बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी आसाराम बापू शिक्षा भोगतोय. तर या प्रकरणानंतर नारायण साई फरार झाला होता. मात्र दोन महिन्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला होता. यासाठी आता सुरत न्यायालयाने सर्व 53 साक्षीदारांचा विचार करता नारायण साईला दोषी ठरवलं आहे. 30 एप्रिल रोजी त्याच्या शिक्षेवर सुनावणी करण्यात येणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याने आपल्या आश्रमात दोन बहिणींवर बलात्कार केल्याची तक्रार पीडित बहिणींनी केली होती.

अल्पवयीन मुलींवर आसाराम बापू यापूर्वीच अटकेमध्ये आहे.

तर आरोपी नारायण साई आरोपांनंतर भूमिगत झाला.

पोलिसांच्या शोधानंतर दोन महिन्यांनी नारायण साई पोलिसांच्या हाती लागला होता.

मुलींकडूल पुराव्यांच्या आधारावर आणि जवळपास 53 साक्षीदारांची साक्ष लक्षात घेऊन नारायण साईला दोषी ठरवण्यात आलंय.

खुद्द नारायण साईच्या पत्नी जानकीने नारायण साईचे लग्नानंतर अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचं मान्य केलं होतं.

यासंबंधी 30 एप्रिलला त्यांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे.

Exit mobile version