Thu. Apr 9th, 2020

…आणि बँक बॅलेन्स पाहून चोराने परत केले पैसे

चाकूचा धाक दाखवत लुटलेल्या महिलेचा बँक बॅलेन्स पाहिल्यानतंर चोराने पैसे परत केल्याची आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. ही घटना चीनमध्ये घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

महिलेचे पैसे परत करणाऱ्या या चोराचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

नेमकं काय घडलं ?

हेयुआन शहरातील आयसीबीसी बँकेत हा प्रकार घडला आहे.

महिला एटीएममधून पैसे काढत असताना चोर तिच्या मागून येते आणि चाकूचा धाक दाखवतो.

महिला एटीएममधून काढलेले 2500 युआन त्याच्याकडे सोपवते. यानंतर चोर तिला एटीएम कार्ड स्वाइप करत बँक बॅलेन्स दाखवण्याची मागणी करतो.

महिलेच्या खात्यात काहीच पैसे नसल्याचे पाहून चोराचं मन बदलतं आणि तो लुटलेले पैसे पुन्हा परत करतो.

घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून चोर बँक बॅलेन्स पाहिल्यानंतर पैसे परत करतो आणि हसत हसत तेथून निघून जाताना या सीसीटीव्हीत दिसतो.

या चोराने मोठं मन दाखवलं असलं तरी तो पोलिसांपासून वाचू शकला नाही.

पोलिसांनी त्या चोराला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *