Thu. Jul 18th, 2019

तुमच्याकडील 500 च्या नोटा तपासून पाहा, ‘असं’ तर होत नाहीये ना?

0Shares

झाडाचं वाळलेलं पान ज्याप्रमाणे हाताने चुरगळताना त्याचे तुकडे पडतात, त्याप्रमाणे पाचशेच्या नोटा घड्या घालताना त्याचे तुकडे पडत असल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात घडला आहे. याबाबत विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांना सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी प्रात्यक्षिक दाखविले आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली असून राठोड यांनी जवळपास 500 रुपयांच्या 14 नोटांच्या म्हणजे तब्बल सात हजार रुपयांबाबत हा प्रकार घडला असून याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

500 च्या नोटेचे तुकडे तुकडे!

विट्यामध्ये रोजंदारीवर मोलमजुरी करणाऱ्या वृद्ध महिलेला दीड महिन्यापूर्वी सात हजार रुपये मिळाले होते.

ते तिने पाकिटात घालून कपाटात ठेवले होते.

15 मे रोजी जेव्हा त्यातील साडेतीन हजार रुपये बाहेर काढले.

हे पैसे रुमालात बांधून मिरच्या आणण्यासाठी बाजारात ती गेली.

त्यानंतर रुमाल उघडून पैसे द्यायचे म्हणून पाचशेची एक नोट काढताच त्या नोटेचे तुकडे झाल्याचं आढळलं.

यानंतर तिने दुसरी नोट काढली असता ती नोटसुद्धा घडी पडताच तुटत असल्याचं दिसून आलं.

घाबरुन त्या महिलेने सर्व नोटांची घडी करून पाहिलं असता त्या सर्व नोटांचे अशाच प्रकारे तुकडे पडत असल्याचं दिसलं.

नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नोटा हलक्या दर्जाच्या!

विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटा या पूर्वीच्या नोटांच्या तुलनेत हलक्या दर्जाच्या आहेत हे शाखा व्यवस्थापकांनीही मान्य केलं. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. अनेकांनी आपापल्या पाचशेच्या नोटा बदलून अथवा मोडून सुट्टे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत ‘बँक ऑफ इंडिया’ अथवा संबंधित यंत्रणेने लक्ष घालावं अशी मागणी होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *