महिलेवर 5 जणांचा सामूहिक बलात्कार, दुष्कृत्याचा व्हिडिओही केला व्हायरल!

राजस्थानात एका महिलेवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची निंदनीय घटना घडली आहे. मात्र एवढ्यावरच न थांबता या निर्लज्ज नराधमांनी आपल्या या लांच्छनास्पद कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
निर्लज्ज नराधमांचं दुष्कृत्य सोशल मीडियावर
26 मे रोजी 30 वर्षीय पीडित महिला आपल्या मैत्रिणीसोबत मंदिरात जात होती.
त्यावेळी 5 जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
या घटनेचा त्यांनीच व्हिडिओदेखील बनवला.
दुसऱ्या दिवशी या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला.
हे बलात्कारी एवढे निर्लज्ज होते, की त्यांनी आपल्या दुष्कृत्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली.
पोलिसांनी 5 जणांपैकी चौघांना अटक केली आहे.
एक जण मात्र अद्याप फरार आहे.
पोलीस पुढील तपास करत आहेत.
आरोपींची चौकशी सुरू असून त्यांना लवकरच न्यायालयात सादर केलं जाईल.