Fri. Aug 12th, 2022

‘फर्जंद’नंतर आता शिवरायांच्या युद्धनीतीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ – ‘फत्तेशिकस्त’!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक युद्धनीतीचं आणि निष्ठावंतं मावळ्याचं अभिमानास्पद रूप ‘फर्जंद’ या सिनेमात पाहायला मिळालं. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता ‘फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर इतिहासातलं आणखी एक सोनेरी पान उलगडणार आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा ‘फत्तेशिकस्त’लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार आहे. पन्हाळगडावर कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला आहे आणि लगेचच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

इतिहासातील मावळ्यांचा सर्जिकल स्ट्राईक’!

कुशाग्र बुद्धिमत्ता, भौगोलिक तथा मानसशास्त्रीय उत्तम समज, दूरदृष्टी,कालसुसंगत युद्धनीती यांच्या बळावर महाराजांनी भल्या-भल्या शत्रूंवरमोठ्या चलाखीने चढाया केल्या आणि प्रत्येक मोहिम फत्ते केली.

आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजीमहाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावरआधारित आहे.

भारतीय लष्कराने केलेल्या थरारक सर्जिकल स्ट्राईकची पाळंमुळं ही शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्येच रुजलेली आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

‘फत्तेशिकस्त’ या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटाद्वारे आपल्याला अशाच एका अतुलनीय लढ्याचे साक्षीदार होण्याची संधी लाभणार आहे.

फत्तेशिकस्तसाठी कलाकारांची तगडी फौज!

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे,अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची फौज ‘फत्तेशिकस्त’च्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. शिवाय हिंदी चित्रपट-मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी सुद्धा या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.