Sun. Jun 20th, 2021

कलम 370 हटवण्याच्या निर्णयानंतर दिल्ली आणि मुंबईत रेड अलर्ट

‘जैश-ए-मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना दिल्ली आणि मुंबईवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं सुरक्षा यंत्रणांना समजलं आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘जैश-ए-मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना दिल्ली आणि मुंबईवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं सुरक्षा यंत्रणांना समजलं आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इब्राहिम असगर या जैशचा दहशतवाद्याने या हल्ल्याचा कट रचला असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे.काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे स्वत: काश्मिरात दाखल झाले आहेत.

दिल्ली आणि मुंबईत रेड अलर्ट

दिल्ली आणि मुंबईत ‘जैश-ए-मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना हल्ला करणार अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मसूद अजहरचा भाऊ इब्राहिम असगर याने या दोन्ही शहरांवर हल्ल्याचा कट रचला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली आणि मुंबईला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जैशचा दहशतवादी इब्राहिम असगर यांनी हल्ल्याचा कट रचला असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली आणि मुंबईला सतर्कतेचा इशारा दिला आहे. कलम 370 हटवण्याच्या निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनादिवशी जैश हा हल्ला करणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.

येत्या स्वातंत्र्यदिनाला देशातील सर्व प्रमुख शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे स्वत: काश्मिरात दाखल झाले आहेत. शोपियां आणि दक्षिण काश्मीरच्या भागांवर दहशतवादाचे सावट आहे.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आदेश अजित डोवाल यांनी दिला आहे. या सर्व भागांमध्ये अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तूंची कमरता होता कामा नये, अशा सूचना त्यांनी  केल्या आहेत. तेथील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *