Tue. Aug 9th, 2022

धाराशिव नामांतरानंतर शिवसैनिकांडून जल्लोष

उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतरानंतर उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिकांनी फटाके फोडुन, गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. तसेच एकमेकांना लाडू भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाता जाता गेली अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण केल्याबद्दल जिल्ह्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान या नामांतराच्या मंजुरीबाबत जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधल्यांनंतर शिवसैनिकांच्या तसेच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या कॅबीनेट बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले होते .महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पाहता उद्धव ठाकरे सरकारची ही कदाचित शेवटची बैठक होती. ठाकरे सरकारने मोठा निर्णय जाहीर केला ठाकरे सरकार कडून नामांतराचे दोन प्रस्ताव मंजूर झाले असून यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी मंजूर झाली आहे. तसेच उस्मानाबादचं धाराशिव नामकरण होणार असल्याचं स्पष्ट झाले .

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.