Mon. Aug 15th, 2022

पंचवीस महिन्यांनी मुख्यमंत्री मंत्रालयात

कोरोना काळानंतर तब्बल पंचवीस महिन्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात हजेरी लावली. मुख्यमंत्री मंत्रालयात दाखल होताच त्यांनी मंत्रालयातील विविध विभागाचा दौरा केला. दरम्यान, मुख्यमंत्री दोन वर्षानंतर मंत्रालयात दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या असून मुख्यमंत्री मंत्रालयात आल्यामुळे आनंद झाल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयाचा कारभार घरूनच पाहत होते. त्यामुळे मुख्यमंत्री मंत्रालयात जात नसल्यामुळे विरोधक त्यांच्यावर टीका करत होते. त्यानंतर आज अखेर मुख्यमंत्री मंत्रालयात हजर झाले आहेत.

कोरोना काळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री राज्यातील अनेक कार्यक्रमांना अनुपस्थित राहिले तर अनेक कार्यक्रमांना त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे हजेरी लावली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्तितीवरून विरोधकांनी त्यांच्यांवर टीकादेखील केल्या आहेत. मात्र, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाची पायरी चढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.