Thu. May 13th, 2021

यूरोप,फ्रान्सनंतर ब्रिटनमध्येही लॉकडाऊन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे युरोपियन देशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे…

यूरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट उद्भवली आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत चालला असून अनेक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. फ्रान्समध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तेथेही गुरुवारपासून टाळेबंदी जाहीर केली गेली. त्यापाठोपाठचं इंग्लंडलाही लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे.


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी टि्वट करून लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन ५ नोव्हेंबरपासून २ डिसेंबर पर्यंत करण्यात आला आहे. नागरिकांना घरी राहण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये असंही सांगितलं आहे. फ्रान्समधील नियमावली पूर्णतः वेगळी असून,तेथे शाळा, आवश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याउलट भारतात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आले आहेत.

पंतप्रधान जॉनसन म्हणाले ‘जबाबदार पंतप्रधान कोरोनाच्या गंभीर आकडेवारीकडे दुर्लक्ष करु शकत नाही’. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन झाले नाही तर देशात दररोज हजारो लोकांचे बळी जातील. कोरोनाचा संसर्ग नियंत्रित होत असताना अचानक रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे युरोपियन देशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *