Fri. Jun 21st, 2019

‘चला हवा येऊ द्या’ ला भोवला ‘हा’ विनोद!

0Shares

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाची प्रसिद्धी सध्या सातव्या आसमानात आहे. लोकांना हसवण्यात हा कार्यक्रम कोणतीच कसूर ठेवत नाही. मात्र नुकत्याच झालेल्या एका भागातील विनोदावर गुदगुल्या होण्याऐवजी काही लोक नाराज झाले आहेत. आगरी-कोळी समाजाने ‘चला हवा येऊ द्या’ वर आक्षेप घेतला आहे. आगरी समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार निर्मात्यांना पत्र पाठवून केली.

5 आणि 6 नोव्हेंबरला झालेल्या एपिसोडमध्ये आगरी पात्र दाखवून त्याच्याकरवी केलेली विनोदनिर्मिती ही आगरी बांधवांना आवडली नाहीय. त्यामुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून ‘चला हवा येऊ द्या’ च्या टीमने आठवडाभरात माफी मागावी अशी मागणी अॅड. भारद्वाज चौधरी यांनी केली आहे.

आगरी भरभरून दागिने घालण्यावरून ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये केलेला विनोद हा अयोग्य असून अंगभर दागिने घालणं ही आगरी समाजाची परंपराच असल्याचं अॅड. भारद्वाज चौधरी म्हणाले. तसंच भरभरून दागिने केवळ आगरीच नव्हे, इतर समाजाचे लोकही घालतात, मग केवळ आगरी समाजालाच त्यासाठी लक्ष्य का केलंय, असा सवाल पत्राद्वारे केला आहे. कोणाची फसवणूक करून किंवा लुबाडून आगरी लोक दागिने घालत नाही. असं असताना कार्यक्रमात आगरी व्यक्तिरेखा अशा पद्धतीने का दाखवली गेली, असाही प्रश्न विचारला आहे. जर कार्यक्रमाच्या टीमने माफी मागितली नाही, तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: