Sun. Sep 22nd, 2019

श्रीपाद छिंदमवर अहमदनगर पोलिसांकडून कारवाई, 15 दिवसांसाठी तडीपार

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला 15 दिवसांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

छिंदमची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छिंदमविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने केली होती. श्रीपाद छिंदमला 16 फेब्रुवारीला पोलिसांनी अटक केली होती. तर 13 मार्च रोजी 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर त्याची नाशिक कारागृहातून सुटका करण्यात आली.

श्रीपाद छिंदमने एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्यासोबत फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यामुळे छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. छिंदम यांची उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *