Wed. Oct 16th, 2019

नगर पुन्हा हादरलं, राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

अहमदनगर पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडाने हादरलयं येथील गोळीबाराचं सत्र थांबण्याच नाव घेताना दिसत नाहीये. अहमदनगरमधील जामखेडमध्ये गोळीबार करून राष्ट्रवादीचे कार्यकर्त्ये योगेश आणि राकेश राळेभात यांची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राकेश ऊर्फ रॉकी अर्जुन राळेभात हे दोघेही दुकानासमोर बसलेले असताना 2 मोटारसायकलवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 3 हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून दोघांवर गोळीबार करत तिथून पळ काढला. त्या दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला, दरम्यान या हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादीकडून जामखेड बंद कऱण्यात आलं आहे.

या घटनेनंतर पालकमंत्री राम शिंदे या ठिकाणी गेले असता संतप्त नातेवाईकांनी निषेधार्थ घोषणा दिल्या. नगरमध्ये महिन्याभरात असे दोन प्रकार घडले, या दोन्ही प्रकारणात गावठी पिस्तुलांचा वापर करण्यात आला आहे. हे दोन्ही प्रकार पाहता प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेतंय याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *