अहमदनगरमध्ये गावगुंडांची अल्पवयीन मुलीला मारहाण
जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
हे राज्य कायद्याचं की गावगुंडांचं हाच प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अहमदनगरचा हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.
सामुदायिक रस्त्यावरुन जायला मनाई केली म्हणून गावगुंडांनी एका मुलीला मारहाण केली. मुलीला शिवीगाळ करत ढकलून दिले.
हा गावगुंड आहे श्रीगोंद्याच्या पारगाव तालुक्यातील. सुनील बोनगे नावाच्या या गावगुंडाला कोणतीही भीती नाही.
हा गावगुंड रस्ता आपल्याच मालकीचा आहे या माजात आहे. एका मुलीनं या गावगुंडांना विरोध करण्याची हिम्मत केली.
इथल्या स्थानिकांनी जी हिम्मत दाखवली नाही ती हिम्मत तीनं दाखवली. पण, गावगुंडांनी तीलाच धमकी दिली. तीलाच मारहाण केली.
अश्लिल शिवीगाळ करत तीला ढकलूनसुद्धा दिलं. या गावगुंडांसोबत दोन अल्पवयीन मुलंसुद्धा होती. पण या मुलांनीही या मुलीला मारहाण करण्यात पुढाकार घेतला.
मुलीसह तीच्या पालकांना बघून घेण्याची धमकीही दिली. सुनील बोनगेसह त्याच्या तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलगा सागर हा एक वर्षांपासून या मुलीची छेड काढत होता. तीला जातीवाचक शिवीगाळ करुन पळवण्याची धमकीही देत होता. आता या गावगुंडांचा माज
ठेचाच अशी मागणी इथले स्थानिक करत आहेत.