Tue. Jan 18th, 2022

अहमदनगरमध्ये ‘ऑनर किलिंग’ नसून प्रियकरानेच केला खून

सोमवारी सकाळी निघोजमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयास पेट्रोल ओतून जाळल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणानंतर जिल्ह्यात नव्हे राज्यात पुन्हा खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून तपास वेगाने सुरू केला आहे.  हे सैराट प्रकरण नसून मंगेशनेच रूक्मिणीला पेटवून मारल्याच प्रथमदर्शनी समोर आले आहे.  रुक्मिणीने पेट घेतल्यावर  मंगेशला मिठी मारली. त्यामुळे त्याला भाजल्याचंही तपासात समोर आलं आहे.

धक्कादायक माहिती उघडकीस !

निघोजमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयास पेट्रोल ओतून जाळल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

पोलीसांच्या तपासात हा  प्रकार त्या प्रिकरानेचं केला असल्याचं विष्पन्न झालो आहे.

मंगेशनेच रूक्मिणीला  पेटवून मारल्याच प्रथम दर्शनी समोर आले आहे.

मगेशने पेटवून दिल्यानंतर रूक्मिणीने मंगेशला मिठी मारली. त्या मंगेश भाजला असल्याचे तपासात आढळून आले.

नेमकं काय  घडलं ?

सहा महिन्यांपूर्वी मंगेश आणि रूक्मिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. या विवाहाला दोघांच्याही कुटूंबांचा विरोध नव्हता.

मात्र लग्नानंतर काही दिवसातच गुन्हेगारी प्रवत्तीच्या मंगेशने रूक्मिणीला त्रास देण्यास सुरुवात केली.

किरकोळ कारणावरून तो तीला बेदम मारहाण करीत असे. घटनेच्या आधी सलग तीन दिवस मंगेशने रूक्मिणीला मारहाण केली होती.

या सगळ्याला रूक्मिणीला गावातील आपल्या माहेरी निघून आली.

त्या दिवशी असं घडलं ?

मारहाणीला कंटाळून रूक्मिणी आणि  तीच्या लहान भावंडाना घरात ठेऊन दाराला बाहेरुन कुलुप लावून जात असे

घटना घडली त्या दिवशीही घरात रुख्मिणीसह तिची लहान भावंडे, निंनचू (वय 6), करिश्‍मा (वय 5) विवेक (वय 3) घरातच होते.

आई घराला बाहेरुन कुलुप लावून मोलमजुरीसाठी निघून गेली. वडिलही सकाळीच मजुरीसाठी बाहेर पडले होते.

रुख्मिणी रहात असलेले घर जुन्या बांधणीचे, लाकडी खांडांचे आहे. घराच्या माळवदाचे एक खांड पडलेले आहे.

1 मे रोजी मंगेशने घराच्या मागच्या बाजूने, पडलेल्या भागातून घरातून प्रवेश केला.

मंगेशने सोबत बाटलीतून पेट्रोल आणले होते. सोबत आणलेले पेट्रोल मंगेशने रूक्मिणीच्या अंगावर ओतले व तिला पेटवले.

रुख्मिणीने पेट घेतल्यावर तीने मंगेशला मिठी मारली.

रूक्मिणीचा लहान भाऊ निंनचूने घटना नेमकी कशी घडली हे पोलीसांना सांगीतले आहे.

आरडाओरडा व घरातून येणारे धुराचे लोट पाहून परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरवाजाला तोडल्यानंतर गंभीर भाजलेल्या अवस्थेतील रूक्मिणी स्वत: घराबाहेर आली.

पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. पुणे येथे उपचारा दरम्यान रूक्मिणीचा मत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *