Mon. Dec 6th, 2021

‘ऑनर किलिंग’ प्रकरणाला वेगळं वळण; ‘त्या’ खोलीत नेमकं काय घडलं ?

आंतरजातीय मुलाशी प्रेमविवाह केल्यामुळे मुलीसह जावयाला रॉकेल ओतून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अहमदनगर येथील निघोज येथे घडली होती. मात्र या घटनेला वेगळं वळण लागले आहे. ही हत्या मुलीच्या कुटुंबियांनी केली नसून तिच्याच पतीने केल्याचे उघडकीस आले आहे. रुक्मिणी रणसिंगला पती मंगेश रणसिंगनेच रॉकेलने पेटवून दिल्याची माहिती रुक्मिणीच्या सहा वर्षाच्या भावाने सांगितले आहे. मात्र पोलिसांनी अद्याप दुजोरा दिला नाही.

नेमकं प्रकरण काय ?

अहमदनगरमध्ये मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे मुलीसह जावयाला पेटवून दिल्याची घटना घडली होती.
प्रेमविवाह असल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी दोघांना पेटवून दिल्याचे म्हटलं जात होतं.
मात्र या घटनेला वेगळच वळण लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
रुक्मिणी रणसिंगला तिच्याच पतीने पेटवून दिल्याची माहिती रुक्मिणीच्या छोट्या भावाने सांगितले आहे.
घरगुती वाद असल्यामुळे रुक्मिणी माहेरी निघून गेली होती.
रुक्मिणी परत घेऊन जाण्यासाठी मंगेश तिच्या घरी आला होता.
मात्र रुक्मिणीने नकार दिल्यामुळे तिला पेटवून दिल्याचे भावाने सांगितले आहे.
तिला पेटवल्यानंतर रुक्मिणीने मंगेशला मिठी मारली.
मंगेश आणि रुक्मिणीने सहा महिन्यापूर्वीच लग्न केले होते.
मात्र मंगेश मारहाण करत असल्यामुळे ती माहेरी आली होती.

याआधीचे वृत्त काय होते ?

मुलीने आंतरजातीय मुलाशी प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी दोघांच्या अंगावर रॉकेल ओतून हत्या करण्याचा प्रयत्न केला.

अहमदनगर येथील पारनेर तालुक्यात ही ऑनर किलिंगची घटना घडली.

दोघांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते.

मात्र मंगेश रणसिंग हे गंभीर जखमी असून रुक्मिणी रणसिंग यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

घरगुती वादातून रुक्मिणी आपल्या माहेरी गेली होती.

यावेळी मंगेश तिला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी रुक्मिणीच्या माहेरी गेला होता.

मात्र रुक्मिणी आपल्या पतीसोबत जात आसताना तिच्या कुटुंबियांनी त्यांना एका खोलीत डांबून ठेवले.

त्यानंतर त्यांच्यावर रॉकेल ओतून मारण्याचा प्रयत्न केला.

हा सर्व प्रकार आंतरजातीय मुलाशी प्रमेविवाह केल्यामुळे घडला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *