Jaimaharashtra news

अहमदनगरमध्ये ‘ऑनर किलिंग’,आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने मुलीची हत्या

आंतरजातीय मुलाशी प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी दोघांच्या अंगावर रॉकेल ओतून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना अहमदनगर येथील पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली आहे. रुक्मिणी रणसिंग असे पत्नीचे नाव असून मंगेश रणसिंग असे पतीचे नाव आहे. यामध्ये मंगेश गंभीर जखमी असून रुक्मिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मुलीने आंतरजातीय मुलाशी प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी दोघांच्या अंगावर रॉकेल ओतून हत्या करण्याचा प्रयत्न केला.

अहमदनगर येथील पारनेर तालुक्यात ही ऑनर किलिंगची घटना घडली.

दोघांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते.

मात्र मंगेश रणसिंग हे गंभीर जखमी असून रुक्मिणी रणसिंग यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

घरगुती वादातून रुक्मिणी आपल्या माहेरी गेली होती.

यावेळी मंगेश तिला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी रुक्मिणीच्या माहेरी गेला होता.

मात्र रुक्मिणी आपल्या पतीसोबत जात आसताना तिच्या कुटुंबियांनी त्यांना एका खोलीत डांबून ठेवले.

त्यानंतर त्यांच्यावर रॉकेल ओतून मारण्याचा प्रयत्न केला.

हा सर्व प्रकार आंतरजातीय मुलाशी प्रमेविवाह केल्यामुळे घडला आहे.

 

 

 

Exit mobile version