Mon. Jun 1st, 2020

भारतीय हवाई दलाचे मिग -२१ पुन्हा कोसळले

भारतीय हवाई दलाचे मिग – २१ बायसन हे विमान दुपारच्या सुमारास राजस्थानच्या बिकानेरमध्ये कोसळले. बिकानेरच्या शोभा सार की धानी या भागात हे विमान कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र  या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून एक वैमानिक बचावला आहे. मिग -२१ बायसन विमानाने सरावासाठी उड्डाण केले होत.

नेमकं काय घडलं ?

राजस्थानच्या बिकानेरमध्ये सार की धानी या भागात भारतीय हवाई दलाचे मिग -२१ विमान कोसळले.

या अपघातातून वैमानिक बचावला आहे.

नाल येथून मिग-२१ बायसन विमानाने सरावासाठी उड्डाण घेतले.

उड्डाणानंतर काही वेळाने हे विमान कोसळले.

तसेच या अपघाताचे काय कारण आहे यावर चौकशी करण्यात यावी असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.

हा अपघात पक्ष्याची धडक बसल्यामुळे हे विमान कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यापूर्वी बालकोटमधील दहशतवादी तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानची विमाने भारतात घुसली होती.

पाकिस्तानी विमानांना पळवून लावताना मीग-21 विमान कोसळले होते.

यावेळी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या हद्दीत उतरले आणि पाकिस्तानने ताब्यात घेतले होते.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *