Fri. Sep 17th, 2021

विमान हायजॅक करण्याची धमकी; विमानतळांवर हाय अॅलर्ट

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचेही जाहीर केले आहे. त्यातच मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन नियंत्रण सेंटरमध्ये ‘विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्यात येईल’, अशी धमकी फोन द्वारे दिली. त्यामुळे सर्व मोठ्या शहरांना हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. यापूर्वी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी 1999 मध्ये काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या विमानाचे अपहरण केले होते.

नेमकं काय घडलं ?

एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोन द्वारे दिली.

एअर इंडियाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या कॉल सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री हा कॉल आला.

त्या व्यक्तीने  ‘एक विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्यात येईल ‘ असे सांगीतले आणि फोन कट केला.

विमान हायजॅक करण्याची धमकी देणारी व्यक्ती  ईग्रंजी भाषेतून संभाषण करत होती.

याबाबत पोलिसांनी तपास सुरू असून फोम कोणी केल्याची माहिती अद्याप समोर आली नाही.

धमकी देणाऱ्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धमकीच्या फोननंतर ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने सर्व विमानतळांना खबरदारीचे निर्देश जारी केले.

सर्व विमानतळांना सतर्क केले असून विमान कंपन्यांच्या सुरक्षेसाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे.

या नियमावलीनुसार विमानतळ परिसरात तसेच रनवे जवळ येणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

तर प्रवासी, कर्मचारी, सामान, कॅटरिंग आदींची ही कडेकोट तपासणीचे आदेश दिले आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *